Home सामाजिक वरोरा येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती साजरी

वरोरा येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती साजरी

1116

वरोरा : चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती बुधवार दि. 19 फेब्रुवारी ला हनुमान मंदिर द्वारकानगरी बोर्डा येथे साजरी करण्यात आली. वरोरा तालुका राष्ट्रीय चर्मकार महा‌संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.         दीप प्रज्वलन करून थोर संत व चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी रविदास महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

.     या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली तर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रविदास परिषद चे राष्ट्रीय महासचिव डॉ. चंद्रशेखर चांदेकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे जिल्हा अध्यक्ष विल्लव  लांडगे, महिला आघाडी राष्ट्रीय चर्मकार महासंघ विदर्भ उपाध्यक्ष अर्चना खंडाळे, शिक्षक कर्मचारी आघाडी जिल्हा अध्यक्ष पुष्पकुमार मेंढे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ वरोरा तालुका अध्यक्ष शंकर वराडकर उपस्थित होते.

.        श्री. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जिवन चरित्र्यावर योग्य मार्गदर्शनकेले असून त्यांनी त्यांचे  आयुष्य हे समाज कार्यासाठी वाहून दिले असून ते मागील वीस वर्षापासून समाजातील प्रत्येक घट‌कांपर्यंत पोहोचले आहे. ते आता विदर्भातीलच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र‌ातील चर्मकार समाजाचे प्रतिनित्व करणार आहे. असे प्रतिपादन संबा वाघमारे यांनी केले.

.       विनोद खोब्रागडे, प्रा. संभा लांडगे, चरणदास लांडगे, चंद्रप्रकाश चावरे, केशव लांडगे, प्रमोद पिंपळकर तथा समाजातील प्रत्येक चर्मकार समाजाचे सहकार्य लागले. संचालन अविनाश कांबळे तर आभार प्रदर्शन प्रशांत बेंडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.

error: Content is protected !!