बल्लारपूर : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.
. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, विद्या देवाळकर, सुरेखा इटनकर, शशिकला जीवने,दिलदार जयकर, लिपीक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, अशोक ठुणेकर, रमा मुंजेकर यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले.


