Home सामाजिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सिंदेवाही तहसील कार्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सिंदेवाही तहसील कार्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न

1101

सिंदेवाही : हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून तहसील कार्यालय सिंदेवाही येथे १९ फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळावा याकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

.     छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जातीना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. १९ फेब्रुवारी ला महाराजांची जयंती निमित्त तहसील कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला तहसीलदार संदीप पानमंद यांचे हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मंगेश तुमराम तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी व विविध शाळेतील शिक्षक उपस्थित होते. जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत सिंदेवाही मधील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रांगोळी स्पर्धे साठी वर्ग १ ते ५, वर्ग ६ ते १० , आणि वर्ग ११ ते १२ असे एकूण तीन गट करण्यात आले होते.सिंदेवाही शहरातील सर्व शाळेमधुन रांगोळी स्पर्धे साठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

.    याप्रसंगी तहसीलदार संदीप पानमंद, नायब तहसीलदार मंगेश तुमराम तसेच महसूल विभागातील अधिकारी हरीश कोवे, दिलीप कुथेकर, बोरकर, कटकमवार, पाकमोडे आदी विभागातील कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!