Home सामाजिक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या  – चैतन्य महाराज राऊत 

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या  – चैतन्य महाराज राऊत

1133

■ चिमुकल्यांनी साकारल्या जिजाऊ, शिवाजी, मावळ्यांच्या प्रतिकृती

■ शिवगर्जनेने दुमदुमली नंदोरी नगरी 

■ शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

■ श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरीचा उपक्रम

भद्रावती : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. वयाच्या केवळ 29 व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते, हे प्रत्येकांनी कधीही नजरेआड करून चालणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या असे प्रतिपादन श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरी बु येथे मंगळवारी किर्तना दरम्यान समजभूषण ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत यांनी केले.

.      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरीच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी रात्री नंदोरी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात अनेक चिमुकल्यांनी माता जिजाऊ, शिवाजी महाराज व मावळ्यांची प्रतिकृती करीत शिवगर्जना देत नंदोरी गाव दुमदुमले होते.

.      17 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळाच्या प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सरपंच तथा सदस्य शरद खामणकर, दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष भानुदास ढवस, स्वप्नील लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य किशोर उमरे, अजित पुसनाके, विनोद लांबट, तंटामुक्त अध्यक्ष आशितोष घाटे उपस्थित होते. 18  फेब्रुवारीला सायंकाळी 8 वाजता समाजभूषण ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत यांचे भव्य किर्तनाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य शरद खामणकर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष भानुदास ढवस, स्वप्नील लांबट व माजी सैनिकांनी उपस्थिती दर्शवली होती. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती भव्य शोभायात्रेला आमदार करण देवतळे यांची उपस्थिती लाभली होती.

.         बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा लांबट, शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, टोल प्लाझा चे व्यवस्थापक पाटील, दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, युवा प्रतिष्ठान नंदोरी चे अध्यक्ष भानूदास ढवस, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य शरद खामणकर, किशोर उमरे, अजित पुसनाके, स्वप्नील लांबट, विनोद लांबट, निखिल ढवस, स्वराज लांबट, स्वप्नील बुरटकर, प्रज्वल एकरे उपस्थिती दर्शवली होती.

.         या शिवजयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १७ फेब्रुवारीला सायंकाळी 6 छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळा, रात्रो 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, 18  फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते 7 वाजता आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, त्या दरम्यान कर्नाटक सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट युवा पत्रकार २०२४ चे पुरस्कार मिळालेले प्रतिक लांबट यांचा राष्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर रात्रो 8 वाजता समाजभूषण ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत यांचे भव्य किर्तन, १९ फेब्रुवारीला  दुपारी 1 वाजता भव्य रक्तदान शिबीर, सायंकाळी 6 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भव्य शोभायात्रा, रात्रो 9 वाजता बक्षीस वितरण करण्यात आले. या तीन दिवशीय स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान समिती नंदोरी तथा समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!