Home सामाजिक चिमुरात पावनखिंड प्रदर्शनीचे आ. भांगडिया यांचे हस्ते उद्घाटन 

चिमुरात पावनखिंड प्रदर्शनीचे आ. भांगडिया यांचे हस्ते उद्घाटन

1109

शिव साम्राज्य प्रतिष्ठानचा उपक्रम

चिमूर : शहरातील शिव साम्राज्य प्रतिष्ठान च्या वतीने या वर्षी पावनखिंड ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वराज्याच्या लढ्यातील प्रदर्षणी साकारण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन आ. किर्तिकुमार भांगडीया यांचे हस्ते रविवारला सायं. 6 वाजता पार पडले.

.       स्वराज्याच्या लढ्यात बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांधल सेनेच्या अमर बलिदानाची शोर्यगाथा प्रदर्शित करणारी प्रदशनी या वर्षी शिव साम्राज्य प्रतिष्ठान द्वारे साकारण्यात आली असून सर्वासाठी प्रदशनी मोफत सायं.6  ते 11  या वेळात व बुधवारला दिवसभर सुरू असणार आहे. बुधवार ला सायं. 4 वाजेपासून वारकरी, मावळे, घोडे, पालख्या, ढोल ताशांच्या पथकासहित, देखाव्याची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार असल्याची माहिती शिव साम्राज्य प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिली.

.        उद्घाटन समारोहात भाजप तालुकाध्यक्ष राजू झाडे, उपसरपंच निखिल डोईजड, सागर  इलकर, वैभव लांडगे, दीपक पुंड, रितेश  चौरे, आदित्य पिसे, तेजस मिसार, विष्णू अंगडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!