माजी वन मंत्री मुनगंटीवारांनी घडविली जंगल सफारी
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा वाघाचा म्हणून ओळखला जातो. ही टायगर्स कॅपिटल आहे. यामुळे सेलिब्रेटींना येथील वाघांची भूरळ पडत आहे. राज्याचे माजी वन मंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन यांना बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा येथे जंगल सफारी घडविली.या दरम्यान रविना टंडन यांना इरिना वाघीनीचे दर्शन घडले. ही सफारी रविवारी घडल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.
. माजी वन मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत रविवारी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन जंगल सफारी करण्यासाठी कारवा येथे आल्या. त्यांनी स्वतःच्या वाहनातून सफारी चा आनंद लुटला. जंगल पर्यटन करत असताना, त्यांना इरिना वाघीनेचे दर्शन घडले. व्याघ्र दर्शनाने त्या चांगल्याच सुखावल्या. त्यांना प्रत्यक्ष व्याघ्र दर्शन घडल्याने जंगल सफारी यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले. जंगल पर्यटन झाल्यावर त्यांनी वाघाबाबत माहिती वन अधिकारी यांचेकडून जाणून घेतली.
. यावेळी रविना टंडन यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे भरभरून आभार व्यक्त केले. यावेळी बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व अन्य अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून कारवा जंगल सफारी ची आठवण सदैव स्मरणात राहील, असा अभिप्राय दिला.


