वरोरा : महावितरण विभागीय कार्यालय वरोरा तसेच रोषनी फाउंडेशन व माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण कार्यालय वरोरा येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर तसेच नेत्रदान जागरूकता शिबिर व मोतीबिंदू निदान व निशुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन महावितरण वरोरा विभाग येथे करण्यात आले. यात 66 नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
. यामध्ये महावितरण मधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच महावितरणच्या परिसरातील व्यक्तींनी देखील सहभाग नोंदविला यामध्ये एकूण 130 लोकांच्या नेत्र तपासण्या निशुल्क करण्यात आल्या व मरणोत्तर नेत्रदानाबाबत रोशनी फाउंडेशन च्या वतीने गैरसमज नष्ट केल्याने तसेच नेत्रदान विषयी जागरूक केल्याने एकूण 66 लोकांनी नेत्रदानाचे संकल्प घेऊन नेत्रदानात आपले योगदान दिले. यावेळी माधव नेत्रालयातर्फे डॉक्टर यांनी मोलाचे योगदान देऊन सर्व नेत्र तपासण्या केल्या. व रोशनी फाउंडेशन तर्फे राजेंद्र जैनभागीरथ साहू सुभाष नाफड़ेदशरथ कळंबेमधुकर वनकर श्रीधर दफ्तरी अनिल माटे अनुपम शुक्ला यादव लक्षणे सुरेश अगडे यांनी नेत्रदान व जनजागृती केल्याने 130 पैकी 66 लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला. तसेच महावितरण वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास नवघरे यांच्या पुढाकाराने व संजय जळगावकर राहुल पावडे, सचिन बदखलभालचंद्र घोडमारे देवेंद्र धनंजोडे अविनाश देवतळे विवेक माटे, यांच्या सहकार्याने लोकांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला.


