मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
विद्यार्थ्यांची साधला संवाद
भद्रावती : चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी विजासन येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची सुसंवाद साधला. याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ व गटशिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते शाळेतील भौगोलिक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले.
. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले त्यावेळी केंद्रप्रमुख मोरेश्वर विघे, मुख्याध्यापिका पेंदाम, शिक्षक अमोल वहाडे, जीवने, चांदेकर, डोंगरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सुरज उमाटे, दीपक कावटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


