Home सामाजिक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखाची मदत

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या कुटुंबाला वनविभागाकडून 25 लाखाची मदत

1092

आ. बंटी भांगडिया यांच्या हस्ते धनादेश वितरित

चिमूर : तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रातील विहीरगाव येथील गुराखी दयाराम लक्ष्मण गोंडाणे यांचा २५ जानेवारीला वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासना कडून आर्थिक मदत केली जाते. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या दयाराम गोंडाने यांच्या कुटुंबाला शासनाकडून २५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली.

.      अंतविधी साठी ५० हजाराची मदत करण्यात आली होती. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश दयारामच्या पत्नी राशीवृद्धा दयाराम गोंडाने यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्या समोर सुपुर्द केला. उर्वरित १५ लक्ष रु फिक्स डीपाझिट स्वरूपात दिल्या जाणार आहे.

.    यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम, मदनापूर वनपाल अमोल कवासे, वनरक्षक नागलोत, मेश्राम, जिवतोडे, जरारे, विहिरगाव चे सरपंच शीतल मुंडरे, उपसरपंच गजभिये, वनसमिती अध्यक्ष रहेमान पठाण गावातील नागरिक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!