Home सामाजिक छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र क्रीडा महोत्सवासाठी निवड

छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र क्रीडा महोत्सवासाठी निवड

1116

वरोरा : सनय बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सुर्ला (बोर्डा) ता. वरोरा च्या दोन विद्यार्थिनिंची महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव (अश्वमेध) करिता निवड करण्यात आली आहे.

.      अश्विनी संजय हजारे हिची कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक विद्यापीठाच्या खो-खो तर वैष्णवी रामचंद्र भोयर हिची विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली. ही स्पर्धा 17 फेब्रुवारीपासून गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे होणार आहे.

.      या दोन्ही विद्यार्थिनीचे कौतुक सनय बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर चे अध्यक्ष सुधाकर खरवडे, उपाध्यक्ष अश्विनी बरडे, सचिव सुनील खरवडे, सहसचिव स्वप्निलं मोरे आणि इतर सर्व सभासद तसेच प्राचार्य दिनकर गुरनुले, प्रा. कोरडे, प्रा. पाटील, प्रा. कापसे, प्रा. खामनकर, तुषार कडू, हर्षद ढवस यांनी  केले आहे.

error: Content is protected !!