Home सामाजिक वरोऱ्यात रंगणार खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा

वरोऱ्यात रंगणार खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा

1102

वरोरा : वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा (WSF) व लोक शिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृती प्रित्यर्थ अखिल भारतीय खासदार चषक पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान लोकमान्य महाविद्यालयाचे मैदानावर करण्यात आलेले आहे.

.     स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने तयार करण्यात आले असून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुरुष गटात प्रथम पुरस्कार 1 लाख रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख चषक, चतुर्थ पुरस्कार 25 हजार रुपये रोख व चषक तसेच महिला विभागात प्रथम पुरस्कार 75 हजार रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार 50 हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार 25 हजार रुपये चषक, चतुर्थ पुरस्कार 15 हजार रुपये चषक तसेच इतर वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.

.      या स्पर्धेमध्ये बंगाल, ओरिसा, तेलंगाना, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात व महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले नामांकित पुरुष व महिला संघ सहभागी होत आहे. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता लोकशिक्षण संस्था वरोडाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शनात आयोजन समितीचे अध्यक्ष मानस बाळू धानोरकर व वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा चे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांचे नेतृत्वात आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू अहोरात्र परिश्रम घेत आहे.

error: Content is protected !!