Home सामाजिक गायत्री थिपे हिने भक्ती व भाव गीतातून उमटविले भावतरंग !

गायत्री थिपे हिने भक्ती व भाव गीतातून उमटविले भावतरंग !

1104

विसापूर येथे सकल कुणबी समाजाची मेजवानी

शास्त्रीय संगीत गायनाने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

बल्लारपूर : आपली संस्कृती बहुआयामी आहे. यातील शास्त्रीय संगीत कलेचा दर्जा मोठा आहे. या कलेचा वारसा ग्रामीण भागात देखील जोपासला जात आहे. याचे प्रतिबिंब बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे नुकतेच दिसून आले. सकल कुणबी समाजाने याची प्रचिती दिली. श्रध्दा व आधुनिकतेच्या संगमातून तिने शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गायत्री थिपे हिने भक्ती व भावगीतातून भावतरंग उमटविले. तिच्या शास्त्रीय संगीत गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

.       बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील उद्न्मुख गायक कलावंत गायत्री थिपे शास्त्रीय संगीत कलेचे धडे गिरवत आहे. तिला प्रोत्साहन देण्याचा अनुषंगाने विसापूर येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले.दरम्यान गायत्री थिपे हिने शास्त्रीय संगीत कार्यक्रमात भक्ती व भावगीतातून श्रध्दा आणि आधुनिकतेच्या संगमातून भावतरंग उमटविले. ‘ माझी मुक्ता माऊली, कल्पवृक्षाची साऊली,’ व ‘ देव माझा विठ्ठू सावळा,’ या अभंगवाणीतून संताचा महिमा आपल्या सुमधुर आवाजात वर्णिला. ‘ सांज ऐ गोकुळे,सावळे सावळे,’ व एक राधा , दोनो ने शाम को चाहा,…एक प्रेम दिवानी,’ हे शास्त्रीय गीत भाव खाऊन गेले. ‘ सुंदर ते घर ,ऊभे विठ्ठेवरी, ‘ हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग भक्ती भाव दर्शविणारा होता. आठवणीतील भक्ती व भावगीतातून निर्माण करणाऱ्या संगमाने प्रेक्षक भारावले.

.     यावेळी गायत्री थिपे हिने , ‘ पैल तोगे,काऊ को कता हे,’ ‘केतकीच्या वनी ,तिथे नाचला ग तो मोर,’ ‘ माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तिरी,’ ‘ झिनी झिनी वाजे बीन,’ ‘ फुलले रे क्षण माझे, व ‘ पायोजी मैंने रामरतन धन पायो,’ आदी भक्ती व भावगीतातून श्रध्दा आणि आधुनिकतेचा संगम गोड व सुमधुर आवाजात गायला. याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

.      यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील टोंगे, प्रा.डॉ. दिलीप चौधरी, ॲड.दिपक चटप, अशोक थेरे, माजी जि.प.सदस्य सुमन गौरकार, शारदा डाहुले, विद्या झाडे, आशा काळे, विलास भोयर, सुरज गोहणे, चंद्रकांत पावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!