Home सामाजिक शेतकऱ्यांसाठी ‘अग्रिस्टक’ नोंदणी ओळख फायदेशीर

शेतकऱ्यांसाठी ‘अग्रिस्टक’ नोंदणी ओळख फायदेशीर

1161

सतीश साळवे यांचे प्रतिपादन

विसापूर येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा

बल्लारपूर : केंद्र व राज्य सरकारने नव्याने ‘अग्रिस्टक’ नोंदणी सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतजमीनींची ओळख पटविण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांसाठी उपयुक्त आहे. यासाठी शासन आपल्या दारात येत आहे. ‘अग्रिस्टक’ च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात शेतकरी आयडी तयार करून घ्यावी. ‘अग्रिस्टक’ नोंदणी ओळख प्रत्येक शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, असे प्रतिपादन बल्लारपूरचे नायब तहसिलदार सतीश साळवे यांनी विसापूर येथे केले.

.        बल्लारपूर तहसील कार्यालय व विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्थानिक सभागृहात ‘अग्रिस्टक’ नोंदणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तत्पूर्वी राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यशाळेचे उदघाटन नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांच्या हस्ते करण्यात आले.

.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार सतीश साळवे, नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, मंडळ अधिकारी किशोर नवले, महसूल अधिकारी आरती दुलत, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा इटनकर, विद्या देवाळकर, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते,लिपीक संतोष निपुंगे ,सेतू केंद्र संचालक इम्रान शेख यांची उपस्थिती होती.

.    यावेळी महेंद्र फुलझेले म्हणाले, शेतकऱ्यांना ‘अग्रिस्टक’ नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक सह संलग्न, बॅंक खाते क्रमांक, ७/१२ उतारा, ८ अ शेतीचा उतारा आदी दस्ताऐवज सेतू सुविधा केंद्रात सादर करून शेतकरी आयडी तयार करून घेण्याबाबत अवगत केले. प्रास्ताविक उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. संचालन संतोष निपुंगे यांनी, तर आभार प्रदर्शन किशोर धकाते यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!