माजरी : कर्मवीर महाविद्यालय माजरी येथे तीन दिवसीय क्रिडा सत्र पार पडले. तर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भावगीत, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एकल नृत्य त्याच बरोबर गृप डान्स स्पर्धा घेण्यात आले. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
. या कार्यक्रमाला ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा चे संचालक उत्तम झाडे, प्राचार्य संतोष चौखे, प्रा. हरिदास वैद्य, प्रा. प्रमोद कोल्हे, प्रा. माहेश्वरी निंबाळकर, संदीप कोमरेडडीवार, अभय भोंगळे, प्रविण लांडगे, गुलाब श्रीरामे, राजेश चहांदे, किशोर निंबूळकर, विनोद हिवरकर, ज्योती तावाडे उपस्थित होते. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ठाकरे व फूलझले यांनी काम पहिले.


