Home सामाजिक संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे द्विदिवसीय आयोजन

संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे द्विदिवसीय आयोजन

1126

भद्रावती : संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती महोत्सव भद्रावती येथील संताजी स्नेही मंडळ द्वारे दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ला आयोजित करण्यात आला आहे या जयंती महोत्सवात तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संताजी स्नेही मंडळ भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे.

.    १ जानेवारीला घटस्थापना व मूर्तिपूजन महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर दिनांक २ फेब्रुवारी ला संताजी जगनाडे महाराज यांच्या भव्य शोभे यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शोभा यात्रेचे उद्घाटन डॉ. सुधीर मोते यांचे हस्ते होणार आहे. त्यानंतर सायं ४ वाजता मुख्य प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश कोरम अध्यक्ष स्टुडन्ट राइट्स फाउंडेशन, उद्घाटक सुमेध खनके एमएसईबी, अमोल काचोरे ठाणेदार भद्रावती, तसेच प्रमुख पाहुणे डॉ प्रदीप वरघने हृदय रोग तज्ञ चंद्रपुर, विवेक पोहाणे ओ एफ चांदा, प्रशांत सुरकर ओ एफ़ चांदा, केशनी हटवार कवि/लेखिका, ज्योतीगोपाल गायकवाड़ (चौधरी) संरक्षण अधीकारी, वर्षा तराळे सरपंच पिरली हे उपस्थित राहणार आहेत.

.     संताजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रा मधे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा सन्मानआणि सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमात भद्रावती तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संताजी स्नेही मंडळ कार्यकारणी समितीने केलेले आहे.

error: Content is protected !!