माजरी : भारतीय जनता पक्षाचे ध्येय राष्ट्रनिर्माण आणि जनकल्याण आहे. भाजपच्या प्रत्येक सदस्यासाठी राष्ट्रसेवा आणि राष्ट्रहित नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. भाजपच्या राष्ट्रहिताच्या व्यापक चळवळीत अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी भाजप सदस्य नोंदणी अभियान माजरीतील जुना बसस्टॅंड येथे रविवारी (दि. १९) राबविण्यात आला.
. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी येथे राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार करण देवतळे व भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस राकेश तालावार आणि त्यांच्या टिमच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी यशस्वीरित्या पार पडली. या अभियानात माजरीतील शेकडो नागरिकांनी भाजपची सदस्यता स्वीकारली. दरम्यान भाजप कामगार महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष तथा माजी जि.प. सभापती अमृता सूर यांनी याठिकाणी भेट देवून अभियानामध्ये उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिठाईचे वितरण केले.
. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजरी शहर अध्यक्ष एम. पी. राव, सुधीर उपाध्या, बाबुराम केवट, बबलू राय, बाबा कोयल, तेलुगु आघाडीचे तोटा शंकर, संदीप वनकर, सदानंदम दसारपु, विनय कुमार, शुभम सोयाम,अमरेश सिंग, कालवला भिमुलू, बंडा सिनू आदी उपस्थित होते.


