Home विदर्भ शंकरपूर येथील भगदाड पडलेल्या रस्त्यावर लावले बेशरमाचे झाड़

शंकरपूर येथील भगदाड पडलेल्या रस्त्यावर लावले बेशरमाचे झाड़

847

 गावातील युवकाचा पुढाकार

नेरी

चिमूर, शंकरपुर, कांपा हा राज्य महामार्ग आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे. बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले नसल्याने त्या रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. याबाबत दिनाक 21 ला शंकरपुर महामार्गावर पडले भगदाड या मथळ्याखाली गावातील युवकांनी सदर खड्यामध्ये बेशरम चे झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध केला आहे.

चिमूर, शंकरपुर, कांपा या राज्य महामार्गवर 15 गावे वसले आहे. तर रस्त्याच्या परिसरात 30 गावे आहेत. हा चिमूर तालुक्यांतील महत्वाचा मार्ग असून या मार्गावर गावातील नागरिकांची तसेच तालुक्यातून कांपा कडे जाणारे नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

शंकरपूर ते कांपा या आठ किलोमीटर च्या अंतरावर तर जीवघेणे खड्डे आहेत या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम व गिट्टी टाकून दोन वेळा बुजविले. परंतु खड्डे आहे तसेच आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे हा रस्ता होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला असून सध्यातरी या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात यावे यासाठी येथील युवकांनी बेशरम चे झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बेशरमची झाडे लावताना आमोद गौरकर, अशोक चौधरी, आशिष चौधरी, निखील गायकवाड, आशु हजारे, गणेश वानकार, साधू गेडाम, विनोद घरत, अमन मेश्राम, प्रियंशु वाढई, नंदू शेरकी, मनोज सहारे, रुपेश रंदये, बबलू शेख सह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!