वरोरा : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत वरोरा तालुक्यातील शेकडो युवकांनी एकत्र येत शिवसेना युवासेनेत पक्ष प्रवेश करत राजकीय क्षेत्रात नव्या उमेदीने पाऊल टाकले. प्रणव परेलवार आणि रितिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
. यावेळी युवासेनेचे महाराष्ट्र सचिव शुभम नवले, महाराष्ट्र कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे, पूर्व विदर्भ निरीक्षक शैलेश केळझरकर, जिल्हा समन्वयक प्रमोद नागोसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आलेख रट्टे यांनी नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. युवासेना तालुकाप्रमुख प्रणव परेलवार आणि तालुका सचिव रितिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत सदस्य सचिन उईके यांच्यासह शुभम भोयर, कुणाल बरतलवार, मंथन नेमाडे, अनिकेत भोयर, महेश पवार, प्रफुल वणकर, निखिल कोटांगळे, सागर कपाटे, गोलू पेचे, मयूर चट्टे, विकी ननकटे, मनीष नंदनवार, देवा वैद्य, रुपेश कायरकर, हर्षल भालेराव, सूरज पारखी, सुहास चौधरी, अक्षय अंद्रस्कर, प्रतीक जाधव, मनोज मेश्राम, गौरव बोबडे, मयंक वाघमारे, निलेश मेश्राम आणि वृशभ फोपारे यांचा यामध्ये समावेश आहे.
. युवासेनेच्या या प्रवेश सोहळ्याने संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, वरोरा तालुक्यातील युवकांच्या सक्रियतेने स्थानिक राजकीय पटलावर युवासेनेची ताकद अधिक वाढली आहे. सामाजिक आणि राजकीय कार्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास साधण्याचा निर्धार या युवकांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्यात युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युवकांना मार्गदर्शन करत संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल सविस्तर माहिती दिली.