नेरी : म. रा. स. संस्था गटसचिव कर्मचारी संघटनाचे वतीने आयोजित अधिवेशनात चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील टेकेपार आदिवासी सहकारी संस्थेचे सचिव मंगेश मस्के यांची संघटक मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. त्याच सोबत विविध कार्यकारी सहकारी संस्था कोरपना चे सचिव हेमंत लोढे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य तर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चे सचिव पंकज रणदिवे यांची राज्य कार्यकारिणी मिडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली.
. महाराष्ट्र राज्य गटसचिव कर्मचारी संघटना मधील त्यांच्या योगदानामुळे व महाराष्ट्र राज्य गटसचिव संघटनेत नियुक्तीबद्दल चंद्रपूर जिल्हा व चिमूर तालुक्याचे वतीने पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.


