Home सामाजिक भांदक प्रेस क्लबची कार्यकारिणी घोषित

भांदक प्रेस क्लबची कार्यकारिणी घोषित

1130

अध्यक्षपदी सुनील बिपटे तर कार्याध्यक्षपदी डॉ. यशवंत घुमे

भद्रावती : येथे भांदक प्रेस क्लबची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. वरदविनायक गवराळा गणेश मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहरातील जेष्ठ पत्रकार अशोक पोतदार होते. यावेळी पत्रकारीतेतील विविध समस्यांवर चर्चा झाली.

.      सर्वानुमते पुढील कार्यकारिणी ठरविण्यात आली. अध्यक्ष सुनील बिपटे (पुण्यनगरी), कार्याध्यक्ष – डॉ. यशवंत घुमे (सह्याद्रीचा राखणदार), उपाध्यक्ष – सुनिल पतरंगे (सकाळ), सचिव – ईश्वर शर्मा (नवभारत), सहसचिव – वतन लोणे (पुण्यनगरी), कोषाध्यक्ष -अब्बास अजाणी (भास्कर), सल्लागार -अशोक पोतदार (लोकवारा), संपर्कप्रमुख – सुधीर पारधी (नवजीवन) यांचा समावेश आहे. या सभेचे सुत्रसंचलन सुनिल पतरंगे, आभारप्रदर्शन सुनिल बिपटे यांनी केले.

error: Content is protected !!