Home सामाजिक भुलक्ष्मी माताच्या पंचवार्षिक उत्सवासाठी तेलुगु भाषिकांचा उसळला जनसागर 

भुलक्ष्मी माताच्या पंचवार्षिक उत्सवासाठी तेलुगु भाषिकांचा उसळला जनसागर

1158

माजरी : सण २०२० मध्ये तेलुगु भाषिकांचे ग्रामदैवत भुलक्ष्मी, महालक्ष्मी देवींचे मंदिर, तेलुगु दफाई, वार्ड क्र. ५ येथे स्थापना करण्यात आले. दरम्यान माता भुलक्ष्मी, महालक्ष्मी देवींची स्थापना होवून पाच वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने शुक्रवारी या देवींचे पंचवार्षिक उत्सवाची जय्यत तैयारी करून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या पूजेसाठी तेलंगाणा राज्यातून विशेष पुजारी बोलाविण्यात आले.

.      २०१९ हे मंदिर बांधण्यात आले. या पूजेसाठी आलेले पुजारी म्हणाले, “देवी भुलक्ष्मी माता जमिनीखालून आली आणि प्रत्यक्षात प्रकट झाली. हे उत्सव तेलुगु भाविकांकडून मागील पाच वर्षापासून साजरा केला जात आहे . या उत्सवात सहभागी होण्यासाठी तेलंगाणा राज्यातून शेकडो भाविक माजरीत दाखल झाले.

.      दरम्यान महिलांनी डोक्यावर नैवेद्याचे कलश डोक्यावर घेवून माजरीच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढत पारंपारिक विधीत माजरीतील दोन्ही काली माता मंदिरात जावून पूजा-अर्चा केली. यादिवशी, भाविक सकाळी ७ वाजल्यापासून भुलक्ष्मी माता मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली.

.     माता महालक्ष्मीच्या आठ अवतारातून भुलक्ष्मी माताचा एक रूप आहे. माता पृथ्वीवरील जीवांची रक्षा करते, आणि ज्या गावात भुलक्ष्मी माताची स्थापना केली जाते, त्या गावातील नागरिकांची ईडा -पीडा,रोगराई, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करते. भुलक्ष्मी माता पुढील वर्षासाठी भविष्यातील घटनांचा अंदाज लावते, अशी तेलुगु भाषिकांची मान्यता आहे. या उत्सवात बोनालूबाबत सांगताना तेलंगाणातून आलेले पुजारी सांगितले की, “या उत्सवात बोनालु म्हणून त्यामध्ये नैवेद्य शिजविली जाते. भक्त भांड्यात आपला नैवेद्य आणून देवीला भोग चढवितात.

.      दिवसभर चाललेल्या या उत्सवाची शेवटी शेळीची बळी देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उत्सवात हजारोच्या संख्येने तेलुगु भाविकांचा उसळला जनसागर. या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!