खासदार डॉ. नामदेव किरसान यांची मागणी
नागभीड : शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या धानाचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी केली असून मागण्या मान्य न झाल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केला आहे.
. चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम मागास क्षेत्र असून लोकसभा क्षेत्रातील बहुतांश शेतकरी व शेतमजुर शेतीवर अवलंबून आहे. शेतीव्यतिरिक्त दुसरा कुठलाही मोठा उत्पादनाचा माध्यम त्यांच्या जवळ नाही, विविध बँक आणि इतर माध्यमातून शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात, मात्र शेतीचे पीक निघून धान विकल्या नंतरही अद्याप अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीचा मोबदला मिळाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शासनाकडून पैसे येन्यास उशिर होत असल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी उत्तरे दिल्या जात आहे, ह्या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांना आपल्याच हक्काच्या पैसा साठी तातकळत राहावे लागत आहे. जर शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचे हप्ते देण्यास विलंब होत असेल तर शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही खासदार डॉ. किरसान यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून दिला आहे.


