Home सामाजिक माजरी ग्रामपंचायत तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

माजरी ग्रामपंचायत तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

1185

माजरी : माजरी ग्रामपंचायतीच्या वतीने मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला माजरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी वाणाच्या स्वरूपात महिलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून ग्रामपंचायत मार्फत वैयक्तिक कचरा कुंडी व कापडी पिशवी वाटप करण्यात आले.

.      दरम्यान माजरी ग्रामपंचायतीचे सरपंच छाया जंगम यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गणवीर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायतीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच छाया जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

.      यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य हॅनसन राव, ग्रा. पं. सदस्य रवि भोगे, ग्रा. पं. सदस्या उषा कुडुदुला, सरिता नगराडे, विद्या गुळगुंडे उपस्थित होते.

.     दरम्यान सरपंच छाया जंगम यांच्या प्रयत्नाने महिला संबंधित हा उपक्रम पहिल्यांदाच माजरी ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी वृंद, संगणक चालिका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गावातील महिलासह मुस्लिम महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गणवीर यांनी केले.

error: Content is protected !!