स्वामीनाथ विद्यालयात सांस्कृतिक क्रीडा महोत्सव
वरोरा : लहान मुलांना शिकविणे कठीण आहे. लहान वयातच त्यांना चांगले वळण लावून चांगले संस्कार लावले तर आदर्श पिढी घडेल असे प्रतिपादन स्वामीनाथ विद्यालयात सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी निवृत्त प्राध्यापिका गायत्री खत्री यांनी केले.
. श्री स्वामी समर्थ बहुउद्देशिय सेवा समिती द्वारा संचालित स्वामीनाथा विद्यालय वरोरा येथे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त प्राध्यापिका गायत्री खटी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकाळचे तालुका बातमीदार बालकदास मोटघरे, स्वामीनाथा च्या मुख्याध्यापिका वर्षा चतुरकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोटघरे म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना डोळ्याचे आजार, चिडचिडेपणा लवकर राग येणे अश्या समस्यां जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून पुस्तक वाचनाकडे वळणे गरजेचे आहे.
. यावेळी शाळेच्या शिक्षिका पूजा जुंजारे, सीमा करडक, अर्चना श्रीरसागर, अमृता कोल्हे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री बोंमटवार यांनी केले.


