आमदार भांगडिया यांनी केले सर्वसमावेशक सदस्यता करण्याचे आवाहन
नागभीड : महाराष्ट्रात भाजपातर्फे संघटन पर्व सुरु असुन चिमुर विधानसभेत भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ आ. कीर्तिकुमार भांगडिया यांच्या हस्ते नागभीड येथे सदस्यता नोंदणी कार्यशाळेत करण्यात आला.
. यावेळी भाजपा जेष्ठ नेते मोरेश्वर ठिकरे, माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक गजानन पाथोडे, तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, कृऊबास सभापती आवेश पठाण, उपसभापती रमेश पाटील बोरकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष इंदुताई आंबोरकर, प्रा. अमीर धम्माणी, न.प.माजी सभापती सचिन आकुलवार यांची मंचावर उपस्थिती होती.
. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा भाजपचा राष्ट्रोन्नतीचा विचार आहे. सशक्त भारत बनवायचा असेल, तर त्यासाठी आधी ‘ सशक्त भाजपा ‘ हे ध्येय सत्यात उतरवावे लागेल. नागभीड येथे सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ करतांना, या अभियानाच्या माध्यमातून चिमुर मतदारसंघातील सर्व समाजातील लोकांना भाजपाच्या विचारांशी जोडण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी आ. कीर्तिकुमार भांगडिया यांनी केले. याप्रसंगी सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्याबद्दल नागभीड तालुका भाजपा तर्फे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला.
. आजपर्यंत समाजातील विविध घटकातील लोकांना मदत करतांना कधीही जातीपातीचा विचार केला नाही. प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होत वैद्यकीय, शैक्षणिक, लग्नकार्य यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. आता यासोबतच समाजापर्यंत पक्षाचा विचार पोहोचविण्याचे कार्य आपल्याला या अभियानांतर्गत करावे लागेल, असे आवाहन आ. भांगडिया यांनी केले.
. या कार्यशाळेत सदस्यता नोंदणीबाबत सविस्तर माहिती माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी देत येत्या १५ जानेवारी पर्यंत सदस्यता नोंदणी च्या लक्ष्यपुर्तीसाठी प्रत्येक घराघरा पोहचत नवमतदारांसह महिला व सर्वच स्तरातील नागरिकांना भाजपाचे सदस्यत्व करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सांगितले. संचालन विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांनी केले तर आभार भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके यांनी मानले. या कार्यशाळेत शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, जि.प व पं.स.प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


