Home सामाजिक मराठी पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन

मराठी पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन

1201

माजरी : माजरी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट येथे मराठी वृत्तपत्राचे  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन वृत्तपत्र विक्रेते तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश दैवलकर यांच्या हस्ते करून आचार्य बाळशात्री जांभेकर यांची जयंती तथा मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.      दरम्यान देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटनेतर्फे सन १९७९ पासून सातत्याने वृत्तपत्र विक्री करणारे माजरीतील एकमेव वृत्तपत्र विक्रेते सुरेश दैवलकर यांना शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंटच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना तसेच माजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ आणि मिष्ठान वाटप करण्यात आला. तसेच माजरी पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवाना मिठाई वाटप करण्यात आला.

.       कार्यक्रमादरम्यान ‘वृत्तपत्र क्षेत्रात सध्या पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही अशी अवस्था निर्माण झाली असून, ढासळणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ सावरण्यासाठी पत्रकारांना आता संघर्ष करावा लागणार आहे, असे प्रतिपादन यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजेश रेवते यांनी केले.

.       वृत्तपत्रे, समाजमाध्यमांवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे. पत्रकारांच्या सुप्त वेदना समजून घेऊन शासनाने धोरणात आमूलाग्र बदल करावा. पत्रकारांना कायमस्वरूपी हक्काचे निवासस्थान, जीवनात स्थैर्य येण्यासाठी अर्थकारणाला गती दिल्यास सहाय्य लाभेल. शासनाने पुढाकार घेऊन पत्रकारांसाठी प्रोत्साहनपर मदत तातडीने जाहीर करावी, अशी आग्रही मागणी उपस्थित पत्रकारांनी केली.

.      दरम्यान परिसरातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व इतर मान्यवरांनी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून माजरीतील सर्व पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

.       कार्यक्रमादरम्यान पत्रकार संघाचे रवि भोगे, रवि कुडुदुला, सुरेंद्र चौहान, चैतन्य कोहळे, विजेंद्र वानखेडे, लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापिका वनिता राजेश रेवते,  शिक्षिका कांचन करनाके, कविता प्रजापती, निकिता बडगु, वनिता मानुसमारे उपस्थित होते.

error: Content is protected !!