अभिजीत कुडे व देवानंद महाजन यांच्या वतीने शिबिराचे आयोजन
वरोरा : तालुक्यातील माढेळी येथे दिनांक 6 जानेवारी 2025 रोज सोमवारी शेतकरी भवन येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. हेल्पएज इंडिया व महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना विधानसभा प्रमुख अभिजित कुडे व सरपंच ग्रामपंचायत माढेळी देवानंद महाजन यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रामानंद वसाके उपतालुका प्रमुख युवासेन यांची उपस्थिती होती. जेष्ठ नागरिकांनी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. “एखाद्यानं चांगलं म्हणावं म्हणून चांगलं करायच नसतं, तर एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून चांगलं करायच असतं, सर्व सामान्य जनतेच्या सेवांसाठी सदैव तत्पर राहून हे रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवणार असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीर आयोजन अत्यंत स्तुत्य उपक्रम असून सर्व सामान्य माणसाला याचा लाभ झाला आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी युवकांचे सहकार्य लाभले.
. या शिबिरात 275 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून 53 रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी महात्मे रूग्णालय नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. यासाठी हेल्पएज इंडिया सीनियर एक्झिक्युटीव्ह रशेदा शेख महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर डॉक्टर अश्विन महात्मे, डॉक्टर हेमंत, प्रफुल्ल उरकुंडे प्रोजेक्ट कॉरडीनेटर, शैलेश सांभे टेक्निशियन, आकांक्षा वैरागडे, नेहा याधो यांची वैद्यकीय टीम उपस्थित होती. उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून मोफत नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झाली.


