Home सामाजिक सरडपार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सरडपार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

1204

सिंदेवाही : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदेवाही अंतर्गत मौजा सरडपार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

.       ३ जानेवारी या क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून बौद्ध समाज संघटना सरडपार यांचे वतीने माळी समाज संघटना आणि बौद्ध समाज संघटना यांचे वतीने संयुक्तरीत्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक एकतेचा नारा दिला. त्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पमाला अर्पण करून दिपज्योत पेटविण्यात आली. त्रिशरण पंचशीला घेऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

.      कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ रवींद्र शेंडे, प्रा.जगदीश सेमस्कर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अंबादास कोसे, मीनाताई बेंडले, रुपेश कोडापे, हिवराज जीवतोडे, पूजा रामटेके, नामदेव गेडाम, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना भारतीय महिलांना त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी स्त्री दास्यत्वातुन मुक्त करण्यासाठी अंगावरती शेण गोळे, चिखल फेक सहन करून सावित्रीबाई स्त्रीवादाची जननी ठरली. असे प्रतिपादन केले. तर प्रा. जगदिश सेमस्कर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांचे केसवपण, बालविवाह,अनिष्ठ चालीरीती यावर घाला घातला.विधवा स्त्रियांचे पुनरविवाह करणे, अनाथाश्रम स्थापन करून समाज जागृतीचे मोलाचे कार्य केले. असे प्रतिपादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्थाविक, व सूत्रसंचालन अंबादास कोसे, यांनी केले. कार्यकामाला सम्पूर्ण बौद्ध बांधव, बौद्ध उपासिका तसेच माळी समाजातील असंख्य बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुना बरसागडे यांनी केले.

error: Content is protected !!