नागभीड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संस्कारमय विद्यार्थी तयार करणारी संघटना असुन राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन देशसेवा करणारे अनेक युवक या संघटनेच्या माध्यमातुन निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या किरण संजय गजपुरे यांनी नागभीड येथे संपन्न झालेल्या अभाविपच्या दोन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
. याप्रसंगी मंचावर अभाविपचे माजी प्रांताध्यक्ष प्रा. योगेश येनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी अभाविप च्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य गणपत देशमुख यांनी केले. संघटनात्मक दृष्ट्या ब्रम्हपुरी जिल्ह्यातील या अभ्यास वर्गात ६ स्थानांवरुन एकूण ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या अभ्यास वर्गात अ. भा. वि. प. परिचय व सैद्धांतिक भूमिका, भाषण सत्र (पंचपरीवर्तन), संपर्क व सक्षम शाखा, महाविद्यालय काम, अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन विषयावर भाषण सत्र, चर्चा सत्र, आयाम, कार्य, गतीविधि,
सत्र संवाद अशा विविध सत्रात वक्त्यांच्या माध्यमातुन प्रबोधन करण्यात आले.
. या वर्गाचा समारोप विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा. अतुल कामडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी पश्चिम क्षेत्रीय सोशल मीडिया संयोजक शुभम सावनकर, ब्रम्हपुरी जिल्हा संघटन मंत्री ऋतिक कानोजिया, जिल्हा संयोजक भूमीका गेडाम, जिल्हा सह संयोजक लोचन तलमले, ब्रम्हपुरी नगरमंत्री चंदा नाकाडे यांची उपस्थिती होती. प्रांत उपाध्यक्ष प्रा. अतुल कामडी यांनी नागभिड नगर कार्यकारणी ची घोषणा केली. यावेळी चेतन नन्नावरे यांना नगर मंत्री नागभिड शाखा असे दायित्व देण्यात आले. समारोपीय भाषणात जिल्हा संघटनमंत्री ऋतीक कनोजिया यांनी वर्षभर झालेले कार्यक्रम, आगामी कार्यक्रम अशा विविध विषयावर बोलतांना कार्यकर्ते व विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


