Home सामाजिक संस्कार ग्रंथालय बोर्डा ( सुर्ला ) येथे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन

संस्कार ग्रंथालय बोर्डा ( सुर्ला ) येथे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन

1417

वरोरा : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत बोर्डा येथील ज्ञानदा वसतिगृहाच्या प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

.       या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वीणा लोणबळे तर उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. उपलेंचवार तसेच प्रमुख पाहुणे राम टोंगे (ग्रंथपाल) हे उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ग्रंथ प्रदर्शनीला उत्स्फर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुशिल शेंदरे (सहा. ग्रंथपाल) यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास ग्रंथालयातील कर्मचारी सुरेश कांबळे, महादेव डाहुले यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!