Home सामाजिक चंदनखेडा येथे ‘शिक्षणयात्रा’ उत्साहात

चंदनखेडा येथे ‘शिक्षणयात्रा’ उत्साहात

73
Oplus_131072

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मोफत उच्च शिक्षणाचे मार्गदर्शन

नेचर फाऊंडेशन, नागपूर आणि विठ्ठल हनवते मित्र परिवाराचा संयुक्त व स्तुत्य उपक्रम

भद्रावती : चंदनखेडा येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे बुधवार, दिनांक ३ जून रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय ‘शिक्षणयात्रा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन ‘नेचर फाऊंडेशन, नागपूर’ आणि माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

.          या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेचर फाऊंडेशनचे संस्थापक निलेश नन्नावरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते १० वी, १२ वी, नवोदय व एकलव्य शाळा प्रवेश परीक्षा, NMMS परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार व गुणगौरव करण्यात आला.

.         यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध केंद्रीय आणि अभिनव विद्यापीठांमधील उच्च शिक्षणाच्या संधी, महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रिया, एकलव्य निवासी शाळा प्रवेश, नामांकित इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण आणि विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांविषयी सविस्तर व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

.       या प्रसंगी माजी उपसरपंच विठ्ठल हनवते, माजी ग्रामपंचायत सदस्या लता नन्नावरे, सुचिता सोनवाने, ‘बार्टी’चे समतादूत गणेश हनवते, गुरुदेव सेवा मंडळाचे श्रीराम सोनुले, सुंदरा नन्नावरे, विकास दोहतरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, प्रणय आगबत्नवार, शौर्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, शंकर दडमल, सारंग भरडे, देविदास चौखे, शुभम भोस्कर, प्रवीण भरडे, राहुल कोसुरकार, मंगेश हनवते आणि दिलीप ठावरी यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!