Home सामाजिक खा. प्रतिभा धानोरकर यांच्याकडून वरोरा शहरात पावसाळापूर्व कामांचे नियोजन

खा. प्रतिभा धानोरकर यांच्याकडून वरोरा शहरात पावसाळापूर्व कामांचे नियोजन

10

‘नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा’ अंतर्गत विविध जनसुविधांचे लोकार्पण !

शहराला पूरमुक्त आणि सुविधायुक्त बनवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून प्रशासकीय यंत्रणेसह पाहणी

अभ्यंकर वॉर्डात ₹१७.६५ लक्षांचे अत्याधुनिक जल शुद्धीकरण संयंत्र आणि वॉटर ए.टी.एम. कार्यान्वित

वरोरा : शहराला पूरमुक्त ठेवण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून शहराचा दौरा केला. केवळ आपत्ती व्यवस्थापनच नव्हे, तर शहराच्या मूलभूत सोयीसुविधांकडेही विशेष लक्ष केंद्रित करत त्यांनी प्रशासकीय समन्वयातून विविध विकासकामांना गती दिली आहे.

युद्धपातळीवर पावसाळापूर्व नियोजन व नाल्यांची पाहणी
पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खासदार धानोरकर यांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन शहरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी आणि पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. “वरोरा शहराची सुरक्षा आणि स्वच्छता हीच आमची प्राथमिकता आहे,” असे सांगत त्यांनी नाल्यांचे खोलीकरण आणि स्वच्छता युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

‘नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा’ अंतर्गत विकासकामांचे लोकार्पण
शहराच्या पायाभूत विकासाला गती देत ‘नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजना २०२५-२६’ अंतर्गत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध जनसुविधांचे लोकार्पण करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अभ्यंकर वॉर्डात १७.६५ लक्ष रुपये खर्चाचे अत्याधुनिक जल शुद्धीकरण संयंत्र (Water Purification Plant) आणि नवीन ‘वॉटर ए.टी.एम.’ कार्यान्वित करण्यात आले आहे. स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, तो पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

झोपला मारोती देवस्थान परिसरातील पाणी प्रश्न मार्गी
या विकास दौऱ्यादरम्यान प्रभाग क्र. ४ मधील झोपला मारोती देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांची पाची अडचण दूर करण्यात आली. येथे नवीन हातपंप आणि १ HP पंपासह पाण्याची टाकी बसवून परिसरातील पाणी पुरवठ्याची मोठी समस्या कायमची मार्गी लावली.

अधिकाऱ्यांची उपस्थिती
याप्रसंगी वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, गटनेते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वेकोलिचे (WCL) क्षेत्रीय मॅनेजर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

.     “प्रशासकीय समन्वयातून पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करून वरोरा शहराला ‘सक्षम, स्वच्छ आणि सुरक्षित शहर’ बनवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत,” असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे वरोरा शहरात विकासाची नवी गती पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!