Home सामाजिक नागरिकांना स्वगणना करण्याची  १५ मे पर्यंत करण्याची संधी !

नागरिकांना स्वगणना करण्याची  १५ मे पर्यंत करण्याची संधी !

9

तहसीलदार रेणुका कोकाटे यांची माहिती

se.census.gov.in या संकेत स्थळावर भरावी

बल्लारपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवार ( दि. १ ) मे पासून जनगणना मोहिम सुरू करण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात घरगणानेची माहिती 33 प्रश्नांच्या माध्यमातून केली जाणार असून स्वजनगणना करण्यासाठी आनलाईन सुविधा कार्यरत करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी येत्या १५ मे पर्यंत स्वगणना करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे, असे आवाहन बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी केली आहे. sc.census.gov.in हे स्वगणना करण्याचे संकेतस्थळ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

.      यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाणार असून नागरिकांना आनलाईन माहिती कार्यरत संकेतस्थळावर अपच्या माध्यमातून भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने 33 विषयांशी संबंधित माहिती स्वगणना करताना नागरिकांना भरावी लागणार आहे. ही स्वगणना मोहिम  १ ते १५ मे या कालावधीतीत करावयाची आहे. स्मार्ट फोन च्या मोबाईल मध्ये सदर लिंक जॉईन करून माहिती भरावी.

.       जनगणनेतील प्रश्नावली मध्ये दूरध्वनी बरोबर स्मार्ट फोन, इंटर नेट सुविधा, एलपीजी जोडणी,आदीचा समावेश आहे. त्याच प्रमाणे कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत कोणता,विज जोडणी, सौर उर्जा, घरातील शौचालय प्रकार असे प्रश्न विचारले आहे. घराचा प्रकार देखील स्वगणना करताना नमुद करायचा आहे. नागरिकांनी स्वगणना करून तहसील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी केले आहे. स्वगणना येत्या १५ मे पर्यंत आनलाईन माहिती भरण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!