Home सामाजिक भद्रावतीत ३० एप्रिलला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

भद्रावतीत ३० एप्रिलला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

17

टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन आणि शिलभद्र मंडळाचा पुढाकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गौतम नगर येथे आयोजन

तज्ज्ञांकडून होणार तोंडाचा, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची मोफत तपासणी 

भद्रावती :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शिलभद्र मंडळ, भद्रावती आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम नगर येथील अशोका बुद्ध विहार येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या गुरुवारी, ३० एप्रिल रोजी सकाळी ०९ ते दुपारी ०१ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

.       आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बदलत्या खानपानामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण चिंताजनक रतीने वाढत आहे. विशेषतः पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर, तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय मुखाचा (सर्वाइकल) कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अनेकदा या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या काळात लक्षात येत नसल्याने उपचार मिळण्यास विलंब होतो. वेळीच तपासणी केल्यास या आजारावर यशस्वी मात करणे शक्य आहे, ही बाब लक्षात घेऊन या विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.       या शिबिरात टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. कॅन्सरचे वाढते धोके टाळण्यासाठी आणि वेळीच निदान करण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः महिलांनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिलभद्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!