Home सामाजिक ‘राष्ट्र प्रथम’ ध्येयाने भाजपचा ४६ वा वर्धापन दिन चंद्रपुरात साजरा

‘राष्ट्र प्रथम’ ध्येयाने भाजपचा ४६ वा वर्धापन दिन चंद्रपुरात साजरा

54

जिल्हा बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा विशेष सन्मान

जनसेवेचा संकल्प करत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह

चंद्रपूर : ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना उरात बाळगून जनसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा ४६ वा वर्धापन दिन चंद्रपूर महानगर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

.       या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी पक्षाच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, “पक्षाचा हा प्रेरणादायी प्रवास सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा आहे. पक्ष संघटना आणि सर्व सहकाऱ्यांनी दिलेला हा मान माझ्यासाठी मोलाचा आहे.” यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना पक्षाची ध्येयधोरणे आणि भविष्यातील विकासाच्या वाटचालीवर सविस्तर चर्चा केली.

.     या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार, ज्येष्ठ नेते अशोक जीवतोडे, सुभाष कासमगोट्टीवार यांसह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त सर्व मान्यवरांनी एकमेकांना शुभेच्छा देत, जनसेवेचा हा वसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!