हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती
वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसारासाठी भद्रावती तालुक्यातील सेवकांचा पुढाकार
भद्रावती : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम अंतर्गत श्रीगुरुदेव भद्रावती तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा चंदनखेडा येथे शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या तत्त्वज्ञान, साहित्य व कार्याचा व्यापक प्रचार व्हावा, या हेतूने रविवारी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
भक्तिमय वातावरणात सुरुवात
मेळाव्याची सुरुवात पहाटे श्रीगुरुदेव अधिष्ठानाचे पूजन व सामुदायिक ध्यानाने झाली. त्यानंतर चंदनखेडा परिसरात ‘रामधून’ काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते.
दोन सत्रांत मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी प्रा. अशोक चरडे यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून हभप केशवानंद मेश्राम महाराज, मधुकरजी बांदुरकर आणि डॉ. शरद उरकांडे उपस्थित होते. यावेळी ह.भ.प. मनोज महाराज चौबे, प्रा. रुपलाल कावळे, गजानन डंभारे, सुवर्णा पिंपलकर यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
. दुसरे सत्र अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या सत्रात दामोदर पाटील, गोपाल कडू, रवी मानव (संचालक, अध्यात्म गुरुकुल मोझरी), गुणवंत कुत्तरमारे आणि विशाल गावंडे यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रसंतांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली. प्रमुख अतिथी म्हणून योगेश्वर कुरेकार आणि बाबाजी दोहतरे उपस्थित होते.
आयोजन समितीचे परिश्रम
या भव्य मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे गुलाब भोयर, डॉ. शरद उरकांडे, विनोद हनवते, दिलीप टोंगे, गुलाब भडके, श्रीराम सोनुले, महादेव बल्की, टीकाराम येवले, रामकृष्ण गाडगे, चंद्रभान चौधरी, योगिता बोढे, मनीषा ठावरी तसेच भद्रावती तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवकांनी व उपासकांनी अथक परिश्रम घेतले.
. कार्यक्रमाचे संचालन भारती उरकांडे व राजू मांडवकर यांनी केले, तर चंद्रशेखर भिवदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


