‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये कोरले नाव
सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पुढाकार
शांततेचा संदेश देण्यासाठी साकारली भव्य मानवी साखळी
चंद्रपूर : देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातून शांतीचा संदेश देण्यात आला, १ हजार ३८१ विद्यार्थी व शिक्षकांनी शांतेतेचे प्रतीक असलेले पिस ऑफ सिम्बॉल ची मानवी साखळी तयार करीत गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव कोरलं. या जागतिक विश्वविक्रमासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन पांडुरंग आंबटकर यांनी पुढाकार घेतला.
२८ मार्चला सकाळी ९ वाजता सोमय्या कॅम्पसमध्ये सकाळी रखरखत्या उन्हात हजारो विद्यार्थी उपस्थित झाले. पांडुरंग आंबट्कर यांच्या उपस्थिती विद्ययार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. यासाठी हजारो विद्यर्थी व शिक्षकांनी शांततेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान केला होता. १०० बाय १०० फूट जागेवर शिस्तबद्ध पद्धतीने १ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित होते, या आयोजनाचे थेट प्रक्षेपण १८० देशात सुरु होते.
अर्धा तासानंतर मानवी साखळी तयार झाली, यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधीने पांडुरंग आंबट्कर यांना या जागतिक विश्वविक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले. पूर्वी हा रेकॉर्ड कर्नाटक राज्यातील १ हजार ७४ विद्यार्थ्यांनी केला होता. कर्नाटकचा रेकॉर्ड चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी मोडला. सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने १ महिन्यात २ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे हे विशेष. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. ते म्हणाले कि चंद्रपूर जिल्हातील सोमय्या इन्स्टिट्यूट ने आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेच्या प्रतिकांची मानवी साखळी तयार करीत जगाला शांततेचा संदेश दिला आहे, हे अतिशय गौरवास्पद आहे. भविष्यात सर्वात जास्त वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रणी क्रमांकावर असेल हे मात्र निश्चित.


