Home सामाजिक भद्रावतीत श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

भद्रावतीत श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

155

भव्य शोभायात्रा आणि कीर्तनाचे आयोजन

२५ व २६ मार्चला विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे कीर्तन व मान्यवरांच्या उपस्थितीत निघणार मिरवणूक

भद्रावती : श्रीराम जन्मोत्सव समिती, भद्रावतीच्या वतीने यावर्षी श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून २५ आणि २६ मार्च २०२६ रोजी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रभू रामचंद्रांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हजारो रामभक्त सहभागी होणार असून प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमांची रूपरेषा
कार्यक्रमाची सुरुवात २५ मार्चला दुपारी ३:३० वाजता राजस्थानी महिला मंडळाद्वारे सादर होणाऱ्या ‘सुंदरकांड’ पठणाने होईल. त्याच रात्री ८ वाजता सोनी व झी टीव्ही फेम डॉ. प्रशांत महाराज ठाकरे (अकोला) यांचे कीर्तन रंगणार आहे. दुसऱ्या दिवशी, २६ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता पुन्हा डॉ. ठाकरे यांचे कीर्तन व श्रीराम जन्म सोहळा उत्साहात पार पडेल. त्यानंतर दुपारी १:०० वाजता अहवाल वाचन व महाप्रसादाचे वितरण केले जाईल.

भव्य शोभायात्रा आणि मार्ग
२६ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता बळवंतदादा गुंडावार व मनोहरराव पारधे यांच्या हस्ते पूजनाने शोभायात्रेचा प्रारंभ होईल. ही यात्रा विठ्ठल मंदिर, किल्लावार्ड, बालाजी सभागृह, भोजवार्ड, जंगलनाका, बाळासाहेब ठाकरे गेट, शिंदे पेट्रोल पंप, जुना बसस्टॉप, नागमंदिर आणि लोकमान्य विद्यालय या मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा मूळ स्थळी विसर्जित होईल.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार योगेश्वर पारधी, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्यासह रवींद्र शिंदे, डॉ. विवेक शिंदे, विलास गुंडावार, प्रकाश कोठारी, सुशील देवगडे, हाजी बबन सेठ यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

.       शोभायात्रेमध्ये विविध आकर्षक देखावे, भजनी दिंडी, झेंडा पथक आणि बँड पथकांचा सहभाग असेल. नागरिकांनी आपापला परिसर सजवून या शोभायात्रेचे स्वागत करावे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व संयोजक चंद्रकांत गुंडावार यांनी केले आहे.

 

error: Content is protected !!