Home सामाजिक भद्रावतीत सोने व्यापाऱ्याकडून ग्राहकाची फसवणूक

भद्रावतीत सोने व्यापाऱ्याकडून ग्राहकाची फसवणूक

256

‘ग्राहक पंचायत’च्या दणक्याने पैसे परत

दोन वर्षांपासून रखडलेली रक्कम मिळवून देण्यात यश

मेश्राम कुटुंबाला दिलासा

भद्रावती : शहरातील एका नामांकित सोने व्यापाऱ्याने ग्राहकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’च्या मध्यस्थीमुळे संबंधित ग्राहकाला आपली हक्काची रक्कम परत मिळाली आहे. स्वरूप मेश्राम या ग्राहकाने याप्रकरणी ग्राहक पंचायतीच्या भद्रावती शाखेकडे लेखी तक्रार केली होती.

.        स्वरूप मेश्राम यांच्या आई संध्या मेश्राम यांनी डिसेंबर २०२३ पासून संबंधित सराफाकडे प्रति महिना ५,००० रुपयांची ११ महिन्यांची ‘आर.डी.’ (गुंतवणूक योजना) सुरू केली होती. अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर ५५,००० रुपये आणि १२ व्या महिन्याचे ५,००० रुपये बोनस स्वरूपात असे एकूण ६०,००० रुपये व्यापाऱ्याने देणे अपेक्षित होते. मात्र, मुदत संपल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये ग्राहक पैसे मागण्यास गेला असता, व्यापाऱ्याने दोन वर्षे टाळाटाळ केली. ग्राहकाचा फोन उचलणे बंद करून दुकानही वारंवार बंद ठेवले जात असल्याने मेश्राम कुटुंब मानसिक त्रासात होते.

.        हताश झालेल्या ग्राहकाने अखेर ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांच्याकडे दाद मागितली. चिमुरकर यांनी तत्काळ संबंधित सुवर्ण व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला ‘ग्राहक संरक्षण कायद्या’ची जाणीव करून दिली आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

.        ग्राहक पंचायतीच्या या दणक्यामुळे व्यापाऱ्याने नमती भूमिका घेतली. त्याने ग्राहकाला ४०,००० रुपयांचा धनादेश दिला, जो खात्यात जमा झाला आहे. तसेच १०,००० रुपयांचे सोने दिले असून उर्वरित १०,००० रुपये एका आठवड्यात देण्याचे कबूल केले आहे. दोन वर्षांपासून रखडलेले पैसे मिळाल्यामुळे मेश्राम परिवाराने ग्राहक पंचायतीचे आभार मानले आहेत.

ग्राहकांनी सजग राहावे, सरकारी संस्थांतच गुंतवणूक करावी”                                                                                                          “ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नियमित कार्य करीत आहे. तरी देखील ग्राहकाने सजग राहावे. आर. डी. काढताना ग्राहकाने नेहमी सरकारी मान्यताप्राप्त संस्थांकडूनच काढावी. आरडी चे पासबुक किंवा इतर कागदपत्रे नेहमी अपडेट आणि सांभाळून ठेवावीत. फसवणूक झाल्यास त्वरित ग्राहक पंचायत महाराष्ट्र सोबत संपर्क साधावा.”                                                                                                                                                                                                              -प्रवीण चिमूरकर,                                                अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती.

error: Content is protected !!