६६ वर्षांनंतर अकोल्यात माजी विद्यार्थ्यांचा भावूक मेळावा
वरोरा तालुक्यातील अकोला नं.१ येथील स्नेहमिलन सोहळ्यात १ लाख २५ हजारांचा निधी गोळा
न्यायाधीश प्रभाकर मोडक यांनी जागवल्या जुन्या आठवणी
वरोरा : “उभ्या आयुष्यात अनेक गुरुवर्यांनी मार्गदर्शन केले, मात्र ठावरी गुरुजींनी दिलेली शिकवण आणि संस्कार सर्वोत्तम ठरले. त्यांच्यामुळेच आम्ही आज या पदापर्यंत पोहोचू शकलो,” अशा भावना न्यायाधीश प्रभाकर मोडक यांनी व्यक्त केल्या. वरोरा तालुक्यातील अकोला नं.१ येथे आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामवासीयांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या भव्य माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
. कार्यक्रमादरम्यान न्यायाधीश मोडक यांनी स्व. नक्षीणे गुरुजींच्या त्यागाची आठवण सांगितली. “चिखलदरा येथील सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठी जात असताना, गुरुजींनी स्वतः बेसन-भाकर खाऊन मला हॉटेलमध्ये जेवण दिले होते,” ही आठवण सांगताना त्यांना गहिवरून आले.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाकर उमरे हे होते. उद्घाटक न्यायाधीश प्रभाकर मोडक हे होते. सत्कारमूर्ती म्हणून नागोराव ठावरी गुरुजी, रेखाताई ठावरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपअभियंता वासुदेव मटाले, सेवानिवृत्त उपअभियंता गुलाब उमरे, सदाशिव उमरे, शामदेव उमरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारोती अतकरे, उद्धव भोगेकर, रामहरी झुंगरे, लहानु बावणे, माधव जुनघरे आदी उपस्थित होते.
![]()
. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शाळेचे पहिले गुरुजी नागोराव ठावरी व त्यांच्या पत्नी रेखाताई ठावरी यांचा सन्मान शाल, श्रीफळ सन्मानपत्र, भेटवस्तू, साडी-चोळी देऊन करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त अभियंता भास्कर मोडक, दादाजी पेचे आणि सुमन अतकरे, न्यायाधीश प्रभाकर मोडक यांनीही यावेळी सत्कारमूर्ती नागोराव ठावरी गुरुजी आणि रेखाताई ठावरी यांचा सत्कार वैयक्तिकरित्या केला.
. सत्काराला उत्तर देताना नागोराव ठावरी गुरुजी म्हणाले, माझी शाळा, माझे विद्यार्थी आणि मी हे सुत्रच मी जीवनामध्ये अवलंबिले. त्यामुळेच माजी विद्यार्थी घडले. डॉक्टर – इंजिनीअर झाले, वकील-न्यायाधीश झाले, शिक्षक-मुख्याध्यापक झाले,. माझ्या हातातील अनेक विद्यार्थ्यांनी शासनाच्या प्रत्येक विभागात सेवा दिली, याचा मला अभिमान आहे. पस्तीस वर्षाच्या सेवाकाळात अकोल्यासारखे प्रेम मी कुठे बघितले नाही. आज माझा भुतो न भविष्यती सत्कार तुम्ही केला, याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. कमलाकर उमरे म्हणाले, ठावरी गुरुजींनी आमच्या आमच्या गावात शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळे चांगले विद्यार्थी घडले. त्यांनी गावाचा विकास केला. त्यामुळे त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोला आणि समस्त ग्रामवासी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ६६ वर्षांनी एकत्र येत देवराव उमरे, रामचंद्र उमरे, विनोद ठावरी, देविदास बोथले, लता ठावरी, बाबा उमरे, तुळशीराम बोथले, पंढरी भोगेकर, गीता ढवस, पद्मा चवले, सुमन अतकरे, पत्रुजी भोगेकर, बेबी नागेकर आदी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या वेळच्या काही गमतीजमती ही सांगितल्या. यावेळी काही सुखावणारे तर काही भावूक करणारे क्षण या निमित्ताने पाहायला मिळाले. ५ डिसेंबर १९६० नंतर हे माजी विद्यार्थी प्रथमच तब्बल ६६ वर्षानी एकत्र आले होते. या स्नेह मिलन मेळाव्यात एकूण १५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. यावेळी १ लाख २५ हजार रुपयाची मदत माजी विद्यार्थी आणि मान्यवरांनी केली. या झालेल्या मदतीतून गाव आणि शाळा विकास करण्याचा मानस असल्याचे अरुण उमरे यांनी सांगितले.
. या स्नेहमिलन मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि स्वागतगीतांनी माजी विद्यार्थी भारावून गेले. त्यामुळे शाळेतील आजी विद्यार्थ्यांना अनेक माजी विद्यार्थ्यांनी बक्षीस ही दिलीत. त्यांचे कौतुकही केले. संचालन शारदा उमरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण उमरे यांनी केले. आभार शामराव मटाले यांनी मानले.
. कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता सदाशिव उमरे, गजानन उमरे,अल्का धुर्वे, दिवाकर रंदई, नारायण गाढवे, विठ्ठल उमरे, भास्कर चवले, आदित्य जुनघरे, पंढरी उमरे, सुनंदा पिदुरकर, कुसुम सावसाकडे, अलका भोगेकर, प्रतिभा उमरे, मीना उमरे, केशव उमरे, पुंडलिक नन्नावरे, महेश उमरे, घानोडे, दिलीप भोगेकर, शामराव मटाले, प्रकाश उमरे, विठ्ठल नन्नावरे, गजानन बुटके, प्रवीण आत्राम, कल्पना कळसकर, निलेश काकडे, मनोज उमरे, विनोद उमरे,अनिकेत चवले, सार्थक उमरे, रोशन उमरे, अनंता बुटके, युवराज भोगेकर, भैरव उमरे, यश उमरे, अनिल सावसाकडे, अतुल सावसाकडे, भास्कर चवले, रवींद्र बावणे, पवन घानोडे, कमलाकर काकडे, दिलीप भोगेकर, कवडू पुसाम, ऋषी उमरे गजानन दशरथ उमरे, पांडुरंग उमरे, हरी कळसकर, भाऊराव भोगेकर, भैय्याजी उमरे, मनोज उमरे, अक्षय मटाले, दामोदर मटाले, महेश मरापे, विना उमरे, सिताबाई उमरे, भगवान उमरे, विठ्ठल पुसाम, बापूराव गाढवे, तात्याजी उमरे, पंढरी बुटके, चिंतामण बुटके, नारायण बावणे, गजभिये, प्रमोद रंदई, पाटील, शेंडे, रामटेके, लक्ष्मण घानोडे, मनोहर मेश्राम, आशिष उईके, सुरेश वानकर, भिमटे आदींनी सहकार्य केले.
. या माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याला मोरवा, अकोला नं २, अकोला नं.१, मोरवा, गिरोला, पारडी येथील ग्रामवासी, माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद, शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.


