Home सामाजिक वरोऱ्यात ६ मार्चला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन

वरोऱ्यात ६ मार्चला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन

291

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेत रंगणार सोहळा

विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती

वरोरा : हिंदू युवा संघटन भारत (ता. वरोरा) च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शुक्रवारी, ६ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. हा सोहळा जुनी पाण्याची टाकी येथील वीर सावरकर चौक परिसरात सायंकाळी ६ ते ११ या वेळेत पार पडणार आहे.

.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर राहणार असून, उद्घाटक म्हणून वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे उपस्थित राहतील.

.      यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, युवा नेते आशिष ठाकरे, उपनगराध्यक्षा योगीता नेरकर, प्रविण सुर, परिक्षीत एकरे, मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनिष जेठाणी, ॲड. जयंत ठाकरे, राहुल देवडे, डॉ. सागर वझे, डॉ. हेमंत खापने, मंगल पिंपळकर, अनिल झोटिंग, नुपूर तेला, रोशनी भडके, अक्षय भिवदरे, योगेश डोंगरवार, प्रकाश खरवडे, शुभम चिमुरकर आणि अक्षय सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

.      कार्यक्रमाचे आयोजन हिंदू युवा संघटन भारतचे जिल्हाध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष पीजदूरकर आणि तालुकाध्यक्ष अक्षय बडसर यांनी केले असून, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!