Home सामाजिक भद्रावतीत शिवजयंतीचा उत्साह : हेल्पिंग हँड्स NGO तर्फे शिवप्रेमींना थंडगार शरबत वाटप

भद्रावतीत शिवजयंतीचा उत्साह : हेल्पिंग हँड्स NGO तर्फे शिवप्रेमींना थंडगार शरबत वाटप

286

छत्रपती शिवाजी महाराज हेल्पिंग हँड्सचे प्रेरणास्थान

भद्रनाथ युथ फाउंडेशनच्या रॅलीत उपक्रम

भद्रावती : शहरात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे हेल्पिंग हँड्स NGO चे नेहमीच प्रेरणास्रोत राहिले आहेत. त्यांच्या या शिवजन्मोत्सवानिमित्त कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी शहरातील स्थानिक NGO “हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पस सोसायटी, भद्रावती” तर्फे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.        भद्रनाथ युथ फाउंडेशन, भद्रावती यांच्या वतीने शहरात भव्य विराट रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतील हजारो शिवप्रेमींसाठी हेल्पिंग हँड्स NGO तर्फे रतन ज्यूस सेंटरसमोर भव्य शरबत वाटप करण्यात आले. रणरणत्या उन्हात शिवभक्तांना थंडगार शरबत मिळाल्याने सर्वांना दिलासा मिळाला.

.        या उपक्रमाला हेल्पिंग हँड्स NGO चे सक्रिय सदस्य आणि हितचिंतक कृतांत सहारे, राजरतन पेटकर, प्रशांत सातपुते, प्रणय कांबळे, रीता सहारे, स्नेहा सातपुते, छकुली पेटकर, स्वप्निल बनकर, वैभव रामटेके, संकेत चिमूरकर, करण सोंडवले, अनिकेत बांबोडे, डॉ. अमित नगराळे, मिलिंद वाघमारे, दिलीप वानखेडे, सोनल पाटील, संदीप चटपकर, रोशन पेटकर, प्रेम सपकाळ, विकास भेले, आकाश मानकर, साजन ढेंगळे, अनिकेत उपरे, सोनू सिंग, सुकेशनी मानकर, किरण कवाडे, लीना उराडे, सुकेशिनी रामटेके, प्राची वेल्हेकर, तुषार दुर्गे, राणी पाल, भाग्यश्री थुलकर, कोमल शिंगाडे, भूषण रामटेके, सागर निरंजने, दक्षिणा हुमणे, राहुल रोडगे आणि इतर सर्व हेल्पिंग हँड्स NGO मित्र परिवार व शुभचिंतकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी जपत हेल्पिंग हँड्सने राबवलेल्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!