Home सामाजिक संत रविदास महाराजांनी जाती निर्मुलनासाठी मोठे योगदान दिले

संत रविदास महाराजांनी जाती निर्मुलनासाठी मोठे योगदान दिले

314

रामभाऊ टोंगे यांचे प्रतिपादन

संत रविदास महाराज जयंती कार्यक्रम

बल्लारपूर : संत रविदास महाराजांनी आपल्याला अमुल्य वाणीतून साडे सहाशे वर्षापूर्वी समाज हितासाठी कार्य केले. ‘मन चंगा तो, कठोती में गंगा’ हा दोहा समाज परिवर्तनासाठी सांगितला.समाजाला अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे कार्य अतुलनीय आहे. सोळाव्या शतकात संत रविदास महाराजांनी जाती निर्मुलनासाठी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांनी विसापूर येथील संत रविदास महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात केले.

.       बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व संत रविदास महिला समितीच्या वतीने स्थानिक संत रविदास संस्कार प्रबोधन केंद्राच्या प्रांगणात संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर येथील मंडळ अधिकारी किशोर नवले, संमोहन तज्ञ डा.हरिभाऊ डोर्लीकर,विसापूरचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, ग्रामपंचायत सदस्य विद्या देवाळकर,राष्ट्रीय चर्मकार महासंघ राज्य उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर, संत रविदास महिला समितीच्या अध्यक्ष संध्या वादेकर यांची उपस्थिती होती.

.       याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामभाऊ टोंगे यांनी भूषविले. दरम्यान मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याला मालार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.डा. हरिभाऊ डोर्लीकर यांनी संमोहन कार्यक्रमातून समाज बांधवांचे प्रबोधन केले. त्यांनी आध्यात्मिक सोबत विज्ञान कसे प्रगत आहे. याचे प्रात्यक्षिक करून उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. संचालन सुभाष भटवलकर यांनी केले. आभार उद्धव खंडाळे यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

error: Content is protected !!