गजानन शिंदे यांचे प्रतिपादन
विसापुरात पार पडले हिंदू संमेलन
बल्लारपूर : प्रत्येक हिंदू समाज बांधवांनी मी देशाचा नागरिक आहे, हा संकल्प करा.जल,जंगल व जमिन आपले समजून पर्यावरणाचे जतन करा.स्वबोध आत्मसात करा. यामुळे सामाजिक समरसता वाढते.राष्ट्रभावना वाढते.सामाजिक समरसता वाढविण्यासाठी सात हजार जातीसमुह म्हणजे समस्त हिंदू समाज रचना आहे, असे ओजस्वी प्रतिपादन विसापूर येथे अनुलोमचे राज्य समन्वयक व भारतीय विचार मंचचे संयोजक गजानन शिंदे यांनी केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर वर्षानिमित्त आयोजित हिंदू संमेलनात कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सकल हिंदू समाजाचे संयोजक अशोक भोयर, व्याखाते गजानन शिंदे, दिनेश क्षीरसागर, सेनापती पोटे,दिनेश गोहणे यांची उपस्थिती होती.
. गजानन शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे राजे होते. त्यांचा आदर्श आपणास प्रेरणा देणारा आहे. खऱ्या अर्थाने ते राष्ट्रपुरुष होते. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्मिती जगाला हिंदू म्हणून केली.पूर्वीच्या व्यवस्थेचे हे परिवर्तन आहे. आपण व आपले पूर्वज राम होते. कृष्ण होते. काही हिंदूत्वाचे स्वरूप विसरले आहे. अशांना जागे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे. दास्यत्व सोडा आणि जगाच्या पाठीवर आपण हिंदू असल्याचा ठसा निर्माण करा,असे गजानन शिंदे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून सोदाहरण हिंदूत्ववादी विचार मांडले.
. तत्पूर्वी येथील हनुमान मंदिर परिसरातून कलशयात्रा काढण्यात आली. ही कलशयात्रा कार्यक्रमस्थळी आल्यावर होमहवन करण्यात आले.यावेळी खुशाल भोयर, दादाजी क्षीरसागर, चंद्रकांत देऊळकर, गणेश आमने, सेनापती पोटे यांनी सपत्नीक होमहवन करून पुजाअर्चना केली. छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान शुभम खुशाल भोयर या विद्यार्थाने देखील मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन दिनेश क्षीरसागर यांनी केले. यावेळी सकल हिंदू समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


