Home सामाजिक सहकार क्षेत्रातील ‘कुटुंबशाही’ मोडीत काढणे काळाची गरज

सहकार क्षेत्रातील ‘कुटुंबशाही’ मोडीत काढणे काळाची गरज

328

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे परखड मत

चंद्रपुरात नवीन सहकार धोरणावर सविस्तर चर्चा

रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

चंद्रपूर : सहकार क्षेत्रात नवीन रक्ताला संधी मिळण्यासाठी आणि ही चळवळ अधिक पारदर्शक करण्यासाठी एकाच कुटुंबाची मक्तेदारी संपवणे आवश्यक आहे. सहकारातील विश्वासार्हता जपण्यासाठी कायद्यातील पळवाटा रोखून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केले.

.     सहकार भारती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन सहकार धोरण’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय रिझर्व्ह बँक व नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते झाले.

कर्जमाफी आणि पारदर्शकतेवर भाष्य
अध्यक्षीय भाषणात रवींद्र शिंदे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले. “नवीन धोरणात कर्जमाफीची स्पष्ट तरतूद असावी, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आणि प्रामाणिक कर्जदारांवर अन्याय होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सतीश मराठे आणि मुख्य मार्गदर्शक विवेक जुगादे यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ‘ग्रामगीता’ भेट देऊन आणि भगवी टोपी परिधान करून यथोचित सत्कार करण्यात आला. मुख्य मार्गदर्शक विवेक जुगादे यांनी नवीन सहकार धोरणातील तांत्रिक पैलू उपस्थितांसमोर मांडले. सहकार भारतीच्या माध्यमातून ही चळवळ अधिक सामर्थ्यशाली करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

उपस्थित मान्यवर
या चर्चासत्राला जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर, एस. एस. बनसोड, बँक संचालक रोहित बोम्मावार, विजय गोटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!