Home सामाजिक महापौर पदासाठी १० तर उपमहापौर पदासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल

महापौर पदासाठी १० तर उपमहापौर पदासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल

341

१० फेब्रुवारीला होणार विशेष सभा

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत रंगणार राजकीय रणधुमाळी

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी ११ ते दुपारी ३ या निर्धारित कालावधीत महापौर पदासाठी एद तर उपमहापौर पदासाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भारतीय जनता ५, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ४, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षाकडून १ नामनिर्देशन दाखल झाले आहे.

.     महापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी संदीप गि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व वैशाली अजय महार तर भारतीय जनता पार्टीकडून संगीता राजेंद्र खांडेकर (३ अर्ज) व सचिन संदुरकर (२ अर्ज) यांचा समावेश आहे. दरम्यान, उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या एकूण ६ नामनिर्देशन भारतीय जनता पार्टी २, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २, भारतीय शेतक कामगार पक्ष – १, तसेच अपक्ष १ नामनिर्देशनाचा समावेश आहे. उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध् अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी, तर भारतीय जनता पार्टीकडून संजय नारायण कंचर्लावार २ अर्जाचा समावेश आहे.

.      महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा आयोरि करण्यात आली आहे.

.      या सभेमध्ये पिठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशन पत्रां छाननी करण्यात येणार असून, छाननीअंती वैध उमेदवारांची नावे जाही जातील. त्यानंतर १५ मिनिटांच्या कालावधीत लेखी नोटीस देऊन उमेद घेता येणार आहे. पुढे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित हात वर करून मतांची नोंद घेण्यात येणार असून, उक्त प्रक्रियेनंतर पिठ अधिकारी निवडणूक निर्णयाची घोषणा करतील.

error: Content is protected !!