Home सामाजिक स्व. जमनाबाई उमरे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व. जमनाबाई उमरे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण

371

अरुण उमरे यांचा स्वगावात निरंतर सामाजिक कार्य करण्याचा संकल्प

वरोरा : तालुक्यातील अकोला नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. जमनाबाई तान्याबापू उमरे फाउंडेशनच्या वतीने अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

.          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष शामदेवराव उमरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष गजानन शामदेव उमरे, प्रतिभा उमरे, अरुण उमरे, सिताबाई उमरे, सदाशिव उमरे, भगवान उमरे, माजी सैनिक गजानन उमरे यांच्यासह नारायण गाढवे, शामराव मटाले, भास्कर चवले, अल्का धुर्वे, भागेरथा उमरे, पंढरी बुटके, चिंतामण बुटके, भाऊराव भोगेकर, बापूराव गाढवे, विठ्ठल पुसाम, छाया भैयाजी उमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

.             फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेताना सांगण्यात आले की, २०१४ मध्ये हेटी (ता. कोरपना) येथील शाळेचा सुवर्ण महोत्सव आणि नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचा शतक महोत्सव साजरा झाला होता. या दोन्ही ऐतिहासिक क्षणांचे औचित्य साधून माजी मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या (स्व. तान्याबापू व स्व. जमनाबाई उमरे) स्मृतीप्रित्यर्थ या फाउंडेशनची स्थापना केली होती. तेव्हापासून हा सेवायज्ञ सुरू आहे. अरुण उमरे यांची जिथे जिथे बदली झाली, तिथे त्यांनी साहित्याचे वितरण केले. कोरोना काळातही सोनुबाई येवले यांच्या आश्रमात मदत पोहोचवण्यात आली.

.           आता उमरे यांची बदली त्यांच्या जन्मभूमीतच झाली असल्याने, उर्वरित काळात आपल्या स्वगावातच सामाजिक कार्य आणि साहित्य वितरण सुरू ठेवण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

.          या कार्यक्रमात अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अरुण उमरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गजानन उमरे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश उमरे, अनिकेत चवले, आशिष उईके, आदित्य जुनघरे, सार्थक उमरे, भैरव उमरे, यश उमरे, युवराज भोगेकर, पवन घानोडे, मारोती घानोडे, रोशन उमरे, अनिल सावसाकडे, अतुल सावसाकडे, अनंता बुटके यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले.

error: Content is protected !!