राष्ट्रीय खेळाडू राशी मांडवकरचा होणार विशेष सत्कार
चंद्रपूर : श्री संत गमाजी महाराज विकास मंडळ, नंदोरी (बु.) च्या वतीने स्व. सेनाजी सखारामजी मांडवकर (गुरुजी) यांच्या स्मृतिनिमित्त मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदोरी येथे ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
. या कार्यक्रमात सीनियर नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेली खेळाडू राशी विनेशचंद्र मांडवकर हिचा विशेष सत्कार करण्यात येईल. तसेच स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोराचे अध्यक्ष गजानन जीवतोडे आणि ज्येष्ठ व्हॉलीबॉल प्रशिक्षक सुनील बांगडे यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.
. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती धनराज विरुटकर राहणार असून, उद्घाटन सरपंच मंगेश भोयर यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ एकरे, शेतकरी उत्पादक महासंघ, चंद्रपूर चे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, युवा सामाजिक कार्यकर्ता अंबर जीवतोडे, शाळा व्यवस्थापन समिती, नंदोरी चे अध्यक्ष घनश्याम ढवस, हनुमान मंदिर देवस्थान समिती नंदोरी चे अध्यक्ष तुळशीदास लांबट, ग्रा.पं. सदस्य तथा हनुमान मंदिर देवस्थान समिती नंदोरी चे सचिव किशोर उमरे, दैनिक नवजीवन, चंद्रपूर चे जिल्हा प्रतिनिधी रवि खाडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, ज्येष्ठ नागरिक आनंदराव जीवतोडे, गुरुदेव सेवा मंडळ, नंदोरी चे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर, गुरुदेव सेवा मंडळ, नंदोरी चे सचिव विनोद लांबट, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी चे मुख्याध्यापक विजय सातपुते उपस्थित राहणार आहेत.
. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गोपालकृष्ण सेनाजी मांडवकर व श्री संत गमाजी महाराज विकास मंडळाने केले आहे.


