Home सामाजिक बल्लारपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदी देवेंद्र आर्य यांची निवड

बल्लारपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदी देवेंद्र आर्य यांची निवड

373

स्विकृत पदावर सदस्य पदावर दोघा माजी नगराध्यक्षांची वर्णी

दोन कुटुंबातील पतीपत्नी राहणार सदस्य

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज सोमवार (दि.१२) रोजी खांडक्या बल्लाळशाह सभागृह, नाट्यगृहात दुपारी १ वाजता नवनिर्वाचित अध्यक्ष अलका अनिल वाढई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

. यामध्ये नगरसेवकांना स्विकृत सदस्य व उपाध्यक्ष पदांसाठी निवड करावयाची होती. येथील नगरसेवकांनी दोन माजी नगराध्यक्षांच्या निवडीवर स्विकृत सदस्य म्हणून शिक्कामोर्तब केले. यामुळे नगरपालिका सभागृहात दोघे पतीपत्नी म्हणून राहणार आहे. येथील उपाध्यक्ष पदी देवेंद्र सत्यदेव आर्य यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी घोषित केले.

. बल्लारपूर येथील नाट्यगृहात आज नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यामध्ये स्विकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, भाजपाचे माजी मावळते अध्यक्ष हरिश शर्मा, माजी उपाध्यक्ष डॉ. सुनिल कुल्दीवार व माजी नगरसेवक भास्कर माकोडे यांची वर्णी लागली. विशेष म्हणजे घनश्याम मुलचंदानी यांची पत्नी रजनी मुलचंदानी या नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या आहे. त्याच प्रमाणे माजी नगरसेवक भास्कर माकोडे यांच्या पत्नी शारदा माकोडे यांना देखील मतदारांनी नगरपालिकेत निवडून पाठवले आहे. आजच्या स्विकृत सदस्यांमध्ये आता हे पतीपत्नी म्हणून शहराचा कारभार सांभाळणार आहे. भाजपाचे ग्रामीण शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हरिश शर्मा यांच्या पत्नी शुभांगी शर्मा या देखील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांंचा पराभव झाला होता. आजच्या निवडणुकीत भाजपाने स्विकृत सदस्य म्हणून हरिश शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने ते पुन्हा सभागृहात दिसणार आहे. कांग्रेसच्या कोट्यातून माजी उपाध्यक्ष डॉ. सुनिल कुल्दीवार यांना स्विकृत सदस्य म्हणून घेण्यात आले. त्यांनी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान अध्यक्ष पदासाठी पत्नीची उमेदवारी दाखल केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे बक्षीस डॉ. सुनिल कुल्दीवार यांना मिळाले.

. बल्लारपूर नगरपालिकेत संख्या बळाचा विचार केला असता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे १७, भाजपाचे ७, शिवसेना उबाठा पक्षाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3, तर शिवसेना शिंदे गटाचा व अपक्ष १ असे सदस्य निवडून आले. यापैकी उपाध्यक्ष पदांसाठी केवळ कांग्रेस पक्षाकडून माजी नगरपालिका गट नेते व नवनिर्वाचित सदस्य देवेंद्र आर्य यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बल्लारपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विशाल वाघ यांनी जाहीर केले. यावेळी स्विकृत सदस्य व उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद साजरा केला.

error: Content is protected !!