प्रियदर्शनी कॉन्व्हेंटचा सांस्कृतिक वार्षिक महोत्सव
विसापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरा झाला. या महोत्सवाला विसापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी चिमुकल्यांनी देशभक्ती, गोंडीनृत्य, चित्रपट गीत, लावणी, भीमगीत,छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव आदी गीतांवर उत्कृष्ट पदलालित्याच्या माध्यमातून नृत्याविष्कार सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
. विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचावर आयोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करुन विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिर्यदर्शनी कांन्व्हेंटचे संचालक व संस्थापक देवराव चनेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते किशोर चोपडे, मुख्याध्यापक रंजना येलमुले,नृत्य शिक्षक श्वेता नगराळे, संचालक मिनाक्षी चनेकर,स्वाती टोंगे, आंनदा कांबळे यांची उपस्थिती होती.
. सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रारंभी नर्सरीच्या चिमुकल्यांनी देशभक्ती नृत्य सादरीकरणाने झाले. यावेळी पालक चांगलेच अंर्तमुख झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणगौरव गितांवर चिमुकल्यांनी चांगलीच करमणूक करत प्रेक्षकांना आदर्श राज्याचा मंत्र दिला. चिमुकल्यांचा नृत्याविष्कार चित्रपट गीतांवर चांगलाच थिरकायला लागले.चिमुकल्यांचे गोंडीनृत्य साऱ्यांना भावले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नृत्याविष्काराला प्रेक्षकांना उत्स्फूर्तपणे दाद देणारे ठरले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक आंनदा कांबळे यांनी केले. आभार मुख्याध्यापक रंजना येलमुले यांनी मानले. यावेळी विसापूरकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


